पिंपरी दि. ७ मार्च २०२२ :- जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. ०८ मार्च २०२२ रोजी भाजपा पिंपरी चिंचवड च्या वतीने शहरातील महिलांना संपुर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन येणार आहे. मेट्रोची पहिली सफर सकाळी ७.३० वा. सुरु करण्यात येणार असुन या सफर मध्ये आमदार तथा शहराध्यक्ष महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व सन्मा. नगरसेवक/नगरसेविका प्रवास करणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि. ०६ मार्च २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडलेला असुन पिंपरी चिंचवड करांच्या सेवेत मेट्रो दाखल झालेली आहे. शहरातील अनेकविध नागरिकांना मेट्रोप्रवास हा कुतूहलाचा विषय झालेला आहे. शहरामध्ये कोविड संक्रमणाच्या काळापासून ते आजतागायत पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयातील रुग्णालयीन व इतर फ्रंटलाईन महिला कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देवुन योगदान देत आहेत. अशा सर्व रुग्णालयीन महिला कर्मचारी जसे की, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, वार्ड आया, पॅरामेडीकल स्टाफ, फ्रंटलाईन महिला कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना तसेच शहरातील ज्या महिला मेट्रो प्रवासासाठी इच्छुक आहेत अशा सर्व महिलांना मंगळवार दि. ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा पिंपरी चिंचवड च्या वतीने संपुर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन येणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मंगळवार दि. ०८ मार्च २०२२ रोजी स. ७.३० वा. मेट्रोची पहिली सफर पिंपरी स्थानक ते फुगेवाडी ते परत पिंपरी अशी होणार असुन, यानंतर दर अर्ध्या तासांनी एक फेरी याप्रमाणे रात्री ९ वा. पर्यंत दिवसभर शहरातील महिलांना मोफत मेट्रो सफर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व फ्रंटलाईन महिला कर्मचारी व इतर जास्तीत जास्त महिलांनी मेट्रो सफरचा अनुभव घ्यावा असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.