पिंपरी :- 2 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याची घोषणा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा विभागीय आढावा बैठकीमध्ये घेतला आहे. यापूर्वी पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या मात्र कोरोनाची तिसऱ्या लाटेमुळे शाळेतील सर्व वर्ग सुरू झाले नाहीत. यापूर्वी पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता पहिलीपासून सर्व वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात कोरोना नियमावली प्रशासनाकडून जाहीर केली आहे. मात्र, पहिली ते आठवी वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. मागील दोन वर्षांपासून पालकांनी महामारी असताना लहान मुलांची काळजी घेतली आहे. तशी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाने मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोवीड नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून शिक्षण द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केलं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील सर्व शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. मागील दोन वर्षापासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा सुरू झाल्या नव्हत्या. कोविड 19 च्या तिसर्या लाटेत रुग्ण संख्या कमी होत असताना व 15 वर्षाच्या पुढील मुलांना covid-19 लसीकरण होत असल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुलांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी, निमसरकारी व खाजगी शिक्षण संस्थांना covid-19 चे नियमांचे काटेकोर पालन करावे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेते शिक्षण संस्था सुरू कराव्यात .