महात्मा गांधी यांनी भेट दिलेल्या ‘स्वालंबन राष्ट्रीय पाठशाळा’ वास्तूचे संवर्धन करा….
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२):- राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बा कस्तुरबा गांधी यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात सन १९१८ व १९२० साली पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्वालंबन राष्ट्रीय पाठशाळा’ येथे भेट देऊन वास्तव्य केले होते. अनेक क्रांतीकारकांनी या वास्तूत स्वातंत्र्य लढ्याचे धडे गिरविले. हि पावन वास्तू पिंपरी चिंचवड महानगरपालिका (प्रभाग क्र. १०) सर्व्हे नं. २३,२४,२५ मोरवाडी ते इंदिरा गांधी उड्डाणपूल मार्गावर (पश्चिम बाजूस) बाफना मोटर्स कंम्पाऊंड येथे आहे. या वास्तूला अनन्य साधारण महत्व आहे. परंतू पिंपरी चिंचवड महानगर- पालिकेकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे. अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश देणा-या महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करुन जतन व संवर्धन करावे अशी सर्व नागरीकांची मागणी आहे याबाबत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली आहे.
——————————————