पिंपरी दि ४:- वर्किंग पिपल्स चार्टर, तथापि संस्था व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथे महासंघाचे कार्यालय परिसरात कष्टकऱ्यांची दिवाळी हा उपक्रम घेण्यात आला दीप प्रज्वलन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. एकमेकांचे सुख- दुःख, प्रश्न जाणून घेऊन त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आणि आपल्या घरी बनवलेल्या गोड-धोड एकमेकांमध्ये वाटप करून आणि उपेक्षित, कोरोना कालावधीत ज्यांच्या नोकरी-व्यवसायावरती परिणाम झाल्या अशा कामगारांना फराळ – मिठाईचे वाटप करून अत्यंत समाधानी वातावरणामध्ये हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते आशुतोष भूपतकर , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, नटराज काला- क्रीड़ा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष महेश स्वामी, कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रसिद्ध कवी सुरेश कंक, राजू बिराजदार, राजेश माने, नाना कसबे, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वृषाली पाटणे, रानी माने, अर्चना कांबळे, अश्विनी मालुसरे, सुनिता दिलपक, कविता राठोड, अंजना गायकवाड, सुनिता आरादे, स्मिता हाके, तुकाराम माने, सखाराम केदार, यासिन शेख, सुरेश देडे आदीसह पुणे जिल्ह्यातिल पदाधिकारी आणी असंघटीत कामगार उपस्थित होते.

याप्रसंगी भूपतकर म्हणाले संपूर्ण जग हे श्रमातून निर्माण झालेले आहे आणि आपण सर्वजण कष्टकरी वर्ग एका विश्वासाने एकत्र आलेला आहात यातून आपले प्रश्न सोडण्यास नक्कीच मदत होईल कोरोना कालावधीमध्ये आपण जे सर्वांनी कार्य उभे केले मदतीचे ते वाखाणण्याजोगे आहे ज्या वेळेला असे प्रसंग येतील तेथे नक्कीच उभे राहू.

पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले आपण अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत आणि पूर्वी बारा तास, अठरा तास काम करायचे त्यावेळी नारायण मेघाजी लोखंडे यांनी या कामगारांना दिलासा दिला आणि त्यांच्या कामाच्या वेळा कमी केल्या. समाजसेवक बाळासाहेब भारदे यांनी म्हटले होते की देशात खरी संस्कृती कुठे नांदते तर कष्टकरी कामगार आणि झोपडीधारकामधे नांदते म्हणून कष्टकरी वर्ग एकत्र आला तर मोठे यश निर्माण होते.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कोरोना कालावधीमध्ये चार घास सुखाचे उपक्रमाबद्दल अनुभव कथन केले आणि कोरोना कालावधीमध्ये शासनाकडून सुमारे बावीस हजार कष्टकऱ्यांना लाभ मिळवून देऊन त्यांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर कोरोना कालावधीमध्ये जे कामगार मृत्युमुखी पडलेल्या त्याच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ याहीपुढे मोठ्या जोमाने काम करेल असा विश्वास त्यानी दिला .

कवी सुरेश कंक यानी विश्वासाचा दागिना लेऊनी जगु जगती माणुसकीची अन प्रेमाची नाती जपू या जगती ही कविता सादरीकरण करून त्यांनी महिलांना घरगुती उद्योगाला प्रोत्साहन देऊन स्वयंप्रेरित करण्यासाठी भर द्यावा असे नमुद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *