पिंपरी :- रुपीनगर येथील माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले. दिवाळी निमित्ताने सत्कार केल्याने या त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद द्विगुणित झाला.

यावेळी स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर, केंब्रिज शिक्षण संस्थेचे डॉ. धनंजय वर्णेकर, रूपीनगर शिक्षण मंडळाचे सचिव शांताराम दगडू भालेकर, संचालक रमेश भालेकर,संचालक दशरथ जगताप, सोमनाथ मेमाणे, अशोक कोकणे, बंटी भालेकर, घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, सचिव बंडू राणे, उपाध्यक्ष गौतम मोकाशी, बाबुराव गाडे, हभप हरिभाऊ वैराट, आनंदा बोराडे, किरण पाटील, शिरीष उत्तेकर, राजेंद्र तापकीर, शरद गो. भालेकर, रामदास कुटे, रविराज शेतसंधी, सागर चव्हाण, सुलोचना भोज, वैशाली भालेकर, वैशाली चव्हाण, सुनील आमने, सागर लोळगे, तोसिफ मुलाणी, सिद्धेश्वरबाप्पा जाधव आदी उपस्थित होते.

 

यावेळी शांताराम बापू भालेकर म्हणाले की, कोरोना काळात या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जी स्वच्छतेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. ती सेवा वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी केलेल्या सत्कार्याचे कौतुक म्हणून या स्वच्छतादुतांचा भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *