– कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान, यशश्री महिला संस्थेतर्फे आयोजन
– महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी :- विशाल नगर, पिंपळे निलख येथे “दिवाळी पहाट” कार्यक्रम अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला. कै.ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान व यशश्री महिला संस्था आयोजित १५ वी “दिवाळी पहाट” कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक तुषार रिठे व कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी महापौर उषामाई ढोरे, नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, दिलीप बालवडकर, रंणजीत कलाटे, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी डोमसे, फिरंगोजी कामठे, भरत इंगवले, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक, नरेश शास्त्री, डॉ. संदीप लुनावत, डॉ. विजय पाटील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित होते. दरम्यान, “स्वराज्याची गडकिल्ले” या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बक्षिस वितरण करुन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण स्नेहल देसले, जोस्ना दाते, श्रीधर दाते संदीप बोडके यांनी केले स्पर्धेत भाग घेतलेल्या ‘टिम’ने आकर्षक अशी रायगड, प्रतापगड, सिंहगड व इतर भव्य किल्ले बनविले. तसेच, त्याविषयी माहिती दिली. “मुलांनी व युवकांनी गडकिल्ले हे फक्त पर्यटनासाठी नसुन तो आपल्या ‘हिंदवी स्वराज्याचा’, देशाचा सोनेरी इतिहास आहे व तो समजुन घेतला पाहिजे,’’ असे मत नगरसेविका आरती चोंधे यांनी व्यक्त केले. “चोंधे परिवार हा राजनैतिक परिवार नसून, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारा परिवार आहे, सुरेशशेठ चोंधे हे दुरदृष्टी असनारे जाणकार नेतृत्व होते”, अशा भावना गणेश कस्पटे यांनी व्यक्त केल्या.