पिंपरी चिंचवड :- “घरचा गणपती व गौरी सजावट ऑनलाइन स्पर्धा २०२१” या स्पर्धेतील विजेत्यांना क्रीडा सभापती व भाजपा नगरसेवक प्राध्यापक उत्तम केंदळे यांच्या हस्ते आज (दि.२६) गोळवलकर गुरुजी स्केटिंग रिंग ठाकरे मैदान यमुनानगर या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले.भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १३ च्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन ढमाले, सुभाष सराफ, भाजपा प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष दीपक कुलकर्णी, भाजपा अध्यक्ष रंगनाथ पवार, बाबा परब,अनिल वाणी, चंद्रकांत शेडगे, विमल काळभोर, भगवान श्राद्धे, गिरीश देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्राजक्ता निफाडकर उमेश घोडेकर, श्रीकांत सुतार, विशाल केंदळे, पंकज कोळी, प्रभू बालचंद्रण,स्वप्नील लोंढे, रुपल माने, प्रशांत बाराथे, कौस्तुभ देशपांडे प्रशांत तरटे आदि उपस्थित होते
समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा विश्वास नगरसेवक उत्तम केंदळे यांनी यावेळी व्यक्त केला.
स्पर्धेतील गणपती सजावटीमध्ये प्रथम पारितोषिक नयना प्रमोद पारखे, सचिन काळे द्वितीय पारितोषिक अक्षय वासुदेव सौंदणकर, प्राची दिलीप भांडवकर तृतीय पारितोषिक तुषार नामदेव साळुंके, सुदेश दुंदळे तर गौरी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक वनिता पडवळ, माधुरी कदम द्वितीय पारितोषिक सौ सपना शरद कदम, सौ स्वाती विकास देशपांडे तृतीय पारितोषिक प्राजक्ता निफाडकर, सौ स्वप्नाली देवचके यांना नगरसेवक केंदळे यांच्या हस्ते देण्यात आले.