पिंपरी :- दिनांक २३/०९/२०२१ रोजी कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये मोफत हृदयरोग तपासनी, ॲन्जोप्लास्टी, कर्करोग, नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अस्थीरोग या सारख्या अनेक रोगांवर सह्याद्री हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, रूबी एलकेअर, समर्थ आय केअर यांचा सहभाग होता. यावेळी महाआरोग्य शिबिरात असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.