पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत देत आहे.
आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये महासंघांचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या समवेत प्रवेश केला.
यावेळी पिपंरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक राजु लोखंडे आदी उपस्थित होते.