पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक ३० फुगेवाडी, दापोडी – कासारवाडी मध्ये युवासेनेतर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धा
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 मधील फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी मध्ये पिंपरी युवासेनेतर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली असून जास्तीत जास्त जणांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी कळविले आहे.
अशी असणार बक्षीसे :-
स्पर्धसाठी पहिले बक्षीस फ्रिज, दुसरे बक्षीस एल. डी टीव्ही, तिसरे बक्षीस ओव्हन, चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस टेबल फॅन, असणार आहे. सहभागी होण्याऱ्या प्रत्येक स्पर्धकला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धाकांनी येथे करा संपर्क :- 8806720672,7276970972 ह्या क्रमांक वर घरी केल्याल्या डेकोरेशन चा फोटो आणि बप्पा सोबत चा सेल्फी व 30 सेकंड चा डेकोरेशन विडिओ पाठवावा लागेल. अशी माहिती पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी दिली.