दापोडीत रेल्वे अपघात थांबवण्यासाठी जनजागृती सामाजिक अभियान..
पिंपरी :- रेल्वे लाइन क्रॉस करतेवेळी रेल्वेची धडक बसून मरण पावलेल्या व्यक्तींची संख्याही सर्वाधिक दापोडी विभागात आहे. रेल्वे लाईन वर अनेक युवक ,नागरिक मुले बसलेले असतात , गुलाब नगर, जय भीमनगर, सिद्धार्थ नगर येथील नागरिक रेल्वे क्रॉसिंग करण्याचा उपयोग करतात तसेच अनेक वेळा काही मुले पतंग किंवा इतर खेळ खेळताना दिसतात तर काही युवक नागरिक मद्यपान करतानाही बसलेले असतात यामुळेच… रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार दखल घेत पुणे आरपीएफच्या वतीने विभागीय सुरक्षा आयुक्त पुणे श्री. उदयसिंग पवारसाहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी, मध्ये रेल्वे लाईन वरील नागरिक व वस्तीमध्ये जाऊन रेल्वे अपघात थांबवण्यासाठी जनजागृती सामाजिक अभियान राबवण्यात आला.
आरपीएफच्या वतीने उपनिरीक्षक श्री. डी. एन. लाड, यांनी रेल्वे लाइन क्रॉस करतेवेळी होणारे अपघात व यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी रेल्वे लाइन क्रॉस न करता पर्याय ब्रिज, रुब तसेच अन्य सुरक्षित मार्गाचा वापर करावा तसेच रेल्वे गाडी वरती दगड व अन्य कोणत्याही वस्तू फेकून मारू नये जेणेकरून जीवितास धोका उत्पन्न होणार नाही, असे कृत्य होणार नाही व रेल्वे लाईन मध्ये बसणारे ,थांबणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे नागरिकांनी पुढे मत व्यक्त केले.
…..यावेळी पुणे विभागीय रेल्वे बोर्ड समिति सदस्य विशाल वाळुंजकर, यांनी रेल्वे प्रशासन व आरपीएफ यांच्या आव्हानाला सहकार्य करावे व आपण आपला जीव इतरांचा जीवाचे काळजी घेऊन रेल्वे लाईन लगतच्या सर्व नागरिक मध्ये जनजागृती लोकसहभागाने करावे असे आवाहन नागरिकांमध्ये केले.
पुणे आरपीएफच्या वतीने अपघात रोखण्यासाठी केलेल्या अभियानामध्ये विभागीय सुरक्षा आयुक्त पुणे, श्री. उदयसिंह पवार साहेब, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर श्री. एन. डी. खिरटकर, साहेब, उपनिरीक्षक खडकी डी. एन. लाड साहेब , पुणे विभागीय रेल्वे कमिटी सदस्य विशाल वाळुंजकर, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र महाजन, कॉन्स्टेबल साईनाथ झंपले,
आरपीआय उपाध्यक्ष सिकंदर सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, रवी शिरसागर, बाबा शेख संदीप तोरणे, यांच्या प्रमुख उपस्थित व नागरिकांनी अभियानात सहभागी झाले.