योगेश बहल यांच्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या आंतरराष्ट्रीय जागतिक संघटनेकडून दखल

पिंपरी दि7 सप्टेंबर – कोरोना संकटकाळात निरपेक्ष आणि प्रामाणिक सेवा करून असंख्य रुग्णांना या जीवघेण्या आजारापासून वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने बहल यांचा ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ हे प्रमाणपत्र  देऊन गौरव करण्यात आला आहे.

संत तुकारामनगर येथे आयोजित कार्यक्रमात हे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहल यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबुब सय्यद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी  श्री ज्ञानेश्वर कांबळे, शेरबहाद्दूर खत्री, ॲड. लक्ष्मण रानवडे, महेंद्र शर्मा, विरेंद्र बहल, देशभूषण दुड्डू, हरप्रीत सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते.

योगेश बहल हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. याबरोबरच ते ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र गेल्या दीड वर्षापासून करोनाविरोधात लढण्यासाठी या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले गेले. सर्वसामान्यांना तात्काळ आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी केलेले मदतकार्य सर्वोत्तम ठरले. ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या या कार्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश मंगलसेन बहल यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. कोरोना संकटकाळात रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कोव्हीडयोद्धयांना हे प्रमाणपत्र दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निर्देश केल्याप्रमाणे कोरोना व्हायरस रोगाच्या सर्वोत्तम प्रतिबंधासाठी मार्गदर्शन तसेच विविध कार्य करणाऱ्या योगेश बहल यांना हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडूनही दखल

करोना काळात ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट आणि योगेश बहल यांनी कोरोना काळात केलेल्या कामांची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतली होती. सर्वसामान्यांप्रती बहल यांनी जोपासलेल्या बांधिलकीबाबत स्वत: शरद पवार यांनी गौरोद्गार काढले होते. याबाबत स्वत: सुप्रिया सुळे यांनी बहल यांच्या कार्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी स्वत:च्या सोशल मीडियावरून त्याबाबत प्रसिद्धी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *