चाकण :- कोरोनाच्या जागतिक महामारीत देशभर औद्योगिक आणि आर्थिक मंदी असताना हिंद कामगार संघटनेने अकरा हजार रुपयांची वेतनवाढ देणारा करार केला आहे. यामुळे कामगारांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाकण येथील अगरवाल पॅकेजिंग प्रा. लि. सोमवार दि. ३० ऑगस्ट २०२१ ला हा व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करारावर सह्या झाल्या. व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्ट सतिशजी गुप्ता, एच आर मॅनेजर भरत गायतोंडे, कंपनीचे वकील ॲड. श्रीनिवास इनामती साहेब आणि हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कैलास कदम (कामगार नेते), संघटनेचे खजिनदार सचिन कदम कामगार प्रतिनिधि महादेव कड, हनुमंत मिंडे, लक्ष्मण बुट्टे, रोहिदास कर्पे, सुनिल मोहिते आदींनी सह्या केल्या आहेत.
हा करार चार वर्षाच्या कालावधीसाठी लागू आहे. सर्व कामगारांना एकूण ११००० रुपये वेतनवाढ मिळणार आहे. सर्व कामगारांनी या कराराबद्दल व्यवस्थापन व हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे आभार व्यक्त केले.