पुणे :- सोसायटी फॉर एथनोफार्माकोलॉजी (स्वित्झर्लंड) संस्थेच्या भारतीय शाखेने पुण्यात अंतरराष्ट्रीय काँग्रेसचे नुकतेच आयोजने केले होते. या कार्यक्रमात बीव्हीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीला हर्बल इंडस्ट्री लीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख डॉ. पवन के. सिंह यांनी स्वीकारला.
बीव्हीजी लाईफ सायन्सेसने सन २०२०-२१ दरम्यान विविध प्रकारच्या हर्बल व आयुर्वेदिक औषधांचे निर्माण केले आहे. त्यातील शतप्लस औषध हे कोरोना रुग्नाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरले आहे. कंपनीची इतर उत्पादने हर्बल व आयुर्वेदिक औषधे निर्मिती क्षेत्रात मैलाचा दगड ठरली असल्याने सदर पुरस्कार बीव्हीजी लाईफ सायन्सेसला प्रदान केल्याचे सोसायटी फॉर एथनोफार्माकोलॉजी (स्वित्झर्लंड) संस्थेने स्पष्ट केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. शिवाजीराव कदम, विविध देशातील शास्त्रज्ञ व प्रतिनिधी उपस्थित होते.