पिंपरी :- ठाणे येथे पालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्तावर मुजोर फेरीवाल्याने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामध्ये महिला अधिकारीची हाताची दोन बोटे छाटली गेली आहेत. ही घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. सदर घटनेचा माजी उपमहापौर, कामगारनेते – केशव घोळवे यांनी जाहीर निषेध केला असुन अशा घटनेची पुनरावृत्ती कोठेही होवू नये म्हणून मनपातील अधिकारी महिला कर्मचारी यांना संरक्षण देणेत यावे, असे निवेदन त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
यावेळी डॉ.प्रितीताई व्हिक्टर (भाजपा कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस), राजश्री जायभाय (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भाजपा महिला कामगार आघाडी), वैशालीताई हांडे (सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र भाजपा), रोहिणीताई मांढरे (भाजपा महिला मोर्चा सचिव पिं.चिं.शहर) आदी उपस्थित होते.