महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन
पिंपरी :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी सोमवारी चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंखनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले. मोरया मंदिर परिसर शंखनाद व घंटा नादाने दुमदुमले.
देशाच्या विविध राज्यात मंदिर, मशिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्ध विहार अशी विविध धर्मियांची धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. पण महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने एकीकडे माँल, बाजारपेठा, दारूची दुकाने, बार, हाँटेल सुरू करण्यास मोकळीक दिलेली आहे. तर दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करण्यास अजूनही मोकळीक न देता निर्बंध कायम ठेवले आहेत. राज्य सरकारच्या या मनमानी ध्येय धोरणाचा यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला.
यावेळी महापौर माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, उपमहापौर नानी घुले, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, आरती चोंधे, निर्मला कुटे, नगरसेवक सागर गवळी, राजेंद्र लांडगे, सुरेश भोईर, शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, अनिल लोंढे, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, प्रभाग स्वीकृत सदस्य संतोष मोरे, दिनेश यादव, विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, प्रदेश युवा मोर्चा चिटणीस अनुप मोरे, युवा प्रदेश सदस्य अजित कुलथे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, विजय शिनकर, ओबीसी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी वीणा सोनवलकर, शहर चिटणीस अपर्णा मणेरीकर, धर्मा पवार, नंदू भोगले, नंदू कदम, गीता महेंद्रू, शोभा भराडे, कविता भोंगाळे, सतपाल गोयल, बाळासाहेब भूंबे, रवींद्र प्रभुणे, मधुकर बच्चे, प्रशांत आगज्ञान, कैलास सानप, सोनम जांभूळकर, सारिका चव्हाण, प्रकाश चौधरी, रवी जांभूळकर, सोनाताई गडदे, अमेय देशपांडे, संजय परळीकर आदी उपस्थित होते.
शंखनाद सरकारपर्यंत पोहोचावा: आमदार लांडगे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली होती. परंतु, राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता आणत अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. पण, मंदिरे बऱ्याच काळापासून बंद आहेत, ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत पिंपरी-चिंचवड येथे शंखनाद केला. याचा ध्वनी सरकारने एकावा, अशी अपेक्षा आहे. मंदिरे हा श्रध्देचा विषय आहेच. त्याही पलीकडे मंदिर आणि त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय हे अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे उदर निर्वाहाचे देखील साधन आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.