पिंपरी :- महाराष्ट्र राज्याचे कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांची “नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेड युनियन” या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये “वरिष्ठ उपाध्यक्ष” म्हणून निवड कारण्यात आली आहे.

एनएफआयटीयु चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिपक जैस्वाल यांनी या निवडीबाबतची घोषणा नवी दिल्ली येथे केली. एनएफआयटीयुही केंद्र शासन मान्य संघटना आहे, या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे देशातील संघटीत, असंघटीत अशा पन्नास कोटीच्या वर असलेल्या कामगारांच्या प्रश्नांकरिता संसदेच्या श्रममंत्रालय निगडीत कामगार कायदे पूनर्गठन समिती, देशभरात असलेल्या अडतीस कोटी असंघटीत कामगारांसाठी काम करणारी वेतन समिती, देशभरातील संघटीत, असंघठीत कामगारांसाठी आर्थिक तरतूद करणारी व कामगार हितासाठी विविध उपक्रम राबविणारी संसदीय स्थायी समिती (कामगार), कामगारांसाठी देशभरात विविध कल्याणकारी काम करणारे विविध बोर्ड या सर्व ठिकाणी एनएफआयटीयु व संघटनेच्या वतीने प्रतिनिधी या नात्याने काम पाहण्याची संधी आता यशवंत भोसले यांना मिळणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करनाऱ्या कामगार संघटनेतही भारतीय श्रमिकांच्या भूमिका मांडण्याची संधी यशवंत भोसले यांना मिळणार आहे.

केंद्र शासनाने देशभरातील केवळ चौदा कामगार संघटनांना मान्यता दिली असुन एनएफआयटीयुही त्यापैकी एक महत्त्वपूर्ण संघटना आहे, संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी यशवंत भोसले यांची निवड झाल्यानंतर यासंदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिपक जैस्वाल यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्रसिंह यादव, राज्यातील सर्व मुख्यमंत्री , महाराष्ट्राचे कामगार मंत्री, तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे डायरेक्टर यांना पत्र पाठवून कळविले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यास कळविण्यात आले आहे.

यशवंत भोसले यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे, आजपर्यंतच्या आयुष्यात माझं जिवन कामगारांच्या न्याय हक्कासाठी वाहवून घेतलं आहे, आणी आज त्यांच्याच भक्कम पाठिंब्याने राष्ट्रीय पातळीवर माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील कामगार नेत्याला संधी मिळाली त्या संधीचे सोने करीन, माझ्या वर जो विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी ठेवला आहे, तो मी सार्थकी ठरवेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *