आमदारांची ताकद व कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा महापालिका जिंकणार
पिंपरी :- राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार विविध प्रकारची दबावतंत्र वापरून भाजपा आमदार लक्ष्मण जगताप व शहराध्यक्ष आ.महेश लांडगे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र भाजपा कोणाच्याही दबावाला भीक घालत नाही भाजपा शहराध्यक्ष आमदार लांडगे व आमदार जगताप यांची ताकद, कार्यकर्त्यांचे बळ या बळावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण तापले आहे या पार्श्वभूमीवर थोरात यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात म्हटले आहे की ,राज्यातील महा विकास आघाडीचे नेते विविध प्रकारे भाजपचे आमदार व नगरसेवकांवर दबाव तंत्र वापरत आहेत सत्तेचा आणि पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे .मात्र आम्ही कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे तीनदा तर शहराध्यक्ष आमदार महेश लांडगेे हे दोनदा लोकमानसातून निवडून आले आहेत त्यांच्यामागे जनाधार आहे याउलट राष्ट्रवादीला मावळात पराभव पत्करावा लागला आहे पिंपरीतील आमदार हेच काय ते राष्ट्रवादीचे भांडवल आहे त्यामुळे खरा जनाधार पाठीशी असलेल्या भाजपा बाबत विरोधकांनी काही बोलणे व महापालिकेत सत्ता आणण्याच्या वल्गना करणे हास्यास्पद असल्याचे अमोल थोरात यांनी म्हटले आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या योजना, कोरोना काळात लोकांना केलेली मदत, शहरात लसीकरणाचा पूर्ण केलेला 12 लाखाचा टप्पा, आयुष्यमान भारत या माध्यमातून पाच लाखाचा सामान्य नागरिकांना विमा, महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे त्यामुळे संघटनेच्या बळावर, दोन आमदारांच्या कामावर, कार्यकर्त्यांचे जाळे या बळावर अन विकास कामांवर भाजप पुन्हा सत्तेमध्ये येईल विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे भाजपाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत 77 नगरसेवक निवडून आले आहेत यावेळी शंभर प्लस चे उद्दिष्ट आहे दोन्ही आमदारांची ताकद संघटना व कार्यकर्त्यांचे जाळे या बळावर हे उद्दिष्ट निश्चित साध्य करू असा विश्वासही अमोल थोरात यांनी व्यक्त केला आहे.