पिंपरी :- फुगेवाडी गावातील घर कोसळून ढीगाऱ्या खाली 13वर्षाची मुलगी पौर्णिमा मडके ही अडकली होती. ह्या मुलीस अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर , व स्थानिक युवक मयूर पुंडे यांनी चार तास अथक परीश्रम करुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले.
आपली जीवाची बाजी लावून मुलीस वाचविल्यामुळे धाडसी मयूर पुंडे ह्यांचा सत्कार पिंपरी युवासेनेतर्फे करण्यात आला. ह्यावेळेस शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके, शिला मामी जाधव, स्वप्नील शेवाळे, अनिल साठे, राजू खलसे, अप्पा घुले, अभिजीत कांबळे, गणेश काटे, शिवा जमादार, सुरज थरकुडे, मयूर घुले, मंगेश कदम उपस्थित होते.