स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचा पुढाकार….
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२१) :- कुदळवाडी येथे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या हस्ते प्रभागातील मतदारांना नवीन ओळखपत्राचे बुधवारी (दि. २५) रोजी वाटप करण्यात आले.
यावेळी कुदळवाडीतील शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सांगभोरे, संपत पोटघन, काका शेळके, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.
दिनेश यादव म्हणाले, नागरिकांसाठी नवीन मतदारकार्ड नोंदणीचा उपक्रम प्रभागात आयोजिला होता. त्या माध्यमातून नागरिकांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. निवडणूक ओळखपत्राचा केवळ मतदानासाठी नव्हे तर शासनाच्या इतर योजनांसाठीदेखील उपयोग होतो. नागरिकांना मतदाराच्या नावात, पत्त्यात बदल, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येईल.