इयत्ता १० वी १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या (२०२०/२०२१) मधील विध्यार्थीना देखील मनपा कडून मिळणार बक्षीस रक्कम ; आमदार अण्णा बनसोडे यांच्या मागणीला यश
पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या सरकारी व खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विध्यार्थ्यांना मनपा च्या नागरी विकास योजना विभागाकडून इयत्ता १० वी १२ वी मध्ये ८० % गुण संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना कल्याणकारी योजनेतुन ठरविक रक्कम बक्षीस दिली जाते.
परंतु मागील वर्षी २०२० मध्ये कोरोना काळात टाळेबंदी मुळे अनेक विद्यार्थी सदर विभागाकडे विहित वेळेत अर्ज करू शकले नाही, अश्या विद्यार्थीनी आमदार बनसोडे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. आमदारांनी विषयाची तात्काळ दखल घेत आयुक्तांकडे मागील वर्षी राहिलेल्या विद्यार्थीचे अर्ज परत भरून घ्या, अशी मागणी केली . आमदारांच्या मागणीची दखल घेत नागरी वस्ती विभागातर्फ़ मागील वर्षी (२०२० -२१) राहिलेल्या विद्यार्थीनी चालू वर्षात अर्ज करावे असे प्रसिद्धी पत्रक काढले आहे .
अर्ज वाटप स्वीकृती दि. १२/०८/२०२१ ते दि. ३०/०९/२०२१
अर्ज मिळण्याचे ठिकाण ; आपल्या जवळचे मनपाचे नागरी सुविधा केंद्र