पिंपरी प्रतिनिधी – नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित केलेल्या गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भक्तिभावाने परिपूर्ण अशा वातावरणात ४००० पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमासाठी वाघेरे यांच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी सुमारे 60 X 200 फूट आकाराच्या मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामध्ये दोन विसर्जन होत, लाडक्या गणरायाची आरती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आले होत्या तसेच विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली होती फक्त व्यक्तिगत बघतच नव्हे तर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व सामाजिक संस्था यांनी देखील विसर्जन केंद्राचा लाभ घेतला पर्यावरण पूरक आणि सु व्यवस्थित विसर्जन हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलीस प्रशासन वाहतूक पोलीस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांच्या मदतीमुळे विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली

या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने व पर्यावरणपूरक मार्गाने मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले. विविध सामाजिक संस्थांचा, स्वयंसेवकांचा आणि युवकांचा देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग दिसून आला.

संदीप वाघेरे यांनी यावेळी सांगितले की, “आपल्या परंपरांचे जतन करताना पर्यावरण रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मूर्ती संकलन व विसर्जन केंद्र हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

विसर्जन केंद्रावर पूजा अर्चा, आरती, मंत्रोच्चार यामधून एक भक्तिमय आणि अनुशासित वातावरण तयार करण्यात आले होते. परिसरात स्वच्छता व सुविधा व्यवस्थापन उत्तमरीत्या केले गेले होते, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सर्व गणेश भक्त, मंडळ प्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानत पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *