चिंचवड :- चिंचवडगावातील रस्टन कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिना पुर्वी स्वच्छ सोसायटी अभियान राबविण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण म्हणुन वासुदेवाच्या वेषात स्वच्छतेबाबत विविध गाणी गात जनजागृती करण्यात अली. या उपक्रमात सोसायटीच्या नागरिकांना उस्फुर्त सहभाग घेतला.
या प्रसंगी सोसायटीचे संचालक सुभाष मालुसरे, भास्कर भोर, पुणे जिल्हा विदुयत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदनकर, मंडळाचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक अनंत गाडे, सभासद गुणवंत ओगले, संतोष मोरजकार, महादेव सुतार , रवी जयस्वाल, नितीन काशीद, कार्तिक सुतार,ऋषिकेश प्रभू, भूषण मोदगेकर, तसेच महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना संसर्ग, तसेच शहरात वाढते साथीचे आजार डेंग्यू , मलेरिया यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यासाठी सर्वांनी घर व आपला परिसर स्वच्छ ठेवणे याशिवाय पर्याय नाही , नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवुन देण्यासाठी वासुदेवाच्य वेशात प्रबोधन करण्यात आले. तसेच सर्व महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.