संभाजीनगर (प्रतिनिधि): संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सुट्टीवर असणारे NSG कमांडो सैनिक श्री. गणेश घुमे यांना नुकतीच पाच पोलिसांसह पोलीस निरीक्षक यांनी किरकोळ कारणास्तव जबर मारहाण करून त्या दरम्यान संबंधित माजी सैनिकास गेली पाच दिवसांपासून जेल मध्ये डांबून ठेवले असल्याची माहिती समजताच सैनिक फेडरेशनच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी व घडलेली घटना जाणून घेण्यासाठी सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिगेडियर श्री. सुधीर सावंत व सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व शंभुसेना संघटना प्रमुख श्री. दिपक राजे शिर्के यांनी पोलिस ठाणे छावणी येथे भेट देऊन वरिष्ठ आधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. अनिल सातव, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब जाधव , सैनिक फेडरेशन चे प्रवक्ते डी. एफ. निंभाळकर, औरंगाबाद जिल्हा संघटक गजानन पिंपळे, रफिक शेख साहेब, माजी सैनिक सुभेदार मेजर बन साहेब, नारायण भोसले, सुदाम साळुंखे साहेब आदींसह असंख्य माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी सैनिकावरील अन्याय अत्याचार प्रसंगाचा निषेध नोंदवत व मारहाण घटनेची कल्पना संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना दिली. सैनिक फेडरेशन लवकरच पोलिस महासंचालक व गृहमंत्री यांची भेटून सैनिकांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रत्यक्ष भेटून संबंधित प्रकरणातील दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सैनिक फेडरेशन द्वारे मागणी केली जाणार असल्याचे सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के यांनी सांगितले.