मुंबई (वृत्तसंस्था ) : येथील सैनिक फेडरेशनच्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या सैनिक फेडरेशन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष ब्रिगेडियर, खासदार मा. सुधीर सावंत साहेब यांच्या हस्ते शंभुसेना संघटनेचे प्रमुख व माजी सैनिक दिपक राजेशिर्के यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र सैनिक फेडरेशन चे मुख्य उद्देश हे आजी- माजी सैनिकांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्याकामी तसेच सैनिक कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करत असते. त्यानुसार फेडरेशन आणखी बळकट होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे भूमिपुत्र व सध्या पुणे येथे कार्यरत असलेल्या एका माजी सैनिक अधिकाऱ्याची म्हणजेच शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा. दिपक राजे शिर्के यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी सार्थ निवड झाल्याने आजी माजी सैनिकांसह शंभुसेना पदाधिकारी व शंभुभक्तांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बैठकी दरम्यान निवड पत्र देताना ब्रिगेडियर, खासदार मा. सुधीर सावंत बोलताना म्हणाले की, दिपक राजेशिर्के हे गेली अनेक वर्ष आजी माजी सैनिकांसह शहीद सैनिकांच्या कुटुंबाचे विविध प्रश्न सोडवत आहेत त्याच बरोबर शंभुसेना संघटनेच्या माध्यमातून ही त्यांनी अवघ्या महाराष्ट्रभर संघटन उभे केले असून त्याद्वारे ते समाजकार्य करत असल्याने अशा विविध कार्याची दखल घेत त्यांची ही निवड झाली आहे.
याप्रसंगी सैनिक फेडरेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री. नारायण अंकुशे, प्रदेश प्रवक्ते डी. एफ. निंबाळकर, प्रदेश सचिव फ्लेक्चर पटेल, खानदेश विभाग प्रमुख श्री. दिनकरराव पवार, नाशिक चे परनेरकर, पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जाधव उपस्थित होते.