पिंपरी : आज प्रभाग क्र २८ पिपंळे सौदागर मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पिंपरी चिचंवड महापालिकेचे आयुक्त श्री. राजेश पाटील यांच्या सोबत माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पाहणी केली यावेळी पिपंळे सौदागर येथील आरक्षण क्र ३५१ अ मधील योगा पार्क उद्यान, १८ मी कुणाल आयकॅान रोड, तसेच मिलेटरी चा १८ मी रस्ता आदी विकास कामांची पाहणी करण्यात आली यावेळी नाना काटे यांनी मिलेटरी रस्त्याच्या पाहणीवेळी कुंजिर चौक येथे मिलिटरी रोड व कुणाल आयकॉन रोड यांना जोडण्यात येणाऱ्या लिंक रस्त्याची जागा संबंधित जागा मालकांना योग्य मोबदला देऊन रस्त्याची जागा ताब्यात घेऊन काम सुरू केल्यास कुणाल आयकॉन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न लवकर सुटेल तसेच पिंपळे सौदागर मधील इतर ताब्यात नसलेले D P रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधित जागा मालाकांशी प्रत्यक्ष भेटून संबंधित अधिकारी यांनी बैठक घेऊन योग्य तो मोबदला लवकर द्या आणि रस्ते विकसित करा.अशा सूचना मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मा. आयुक्तांना सूचना केल्या. या सूचनेला अनुसरून मा. आयुक्तांनी संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांना सदरील सूचनेनुसार रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यास सांगितले व DP रस्त्या बाबत बैठकीचे नियोजन करण्याचे सूचना केल्या.या पाहणी वेळी स्मार्ट सिटी चे जनरल मॅनेजर श्री. अशोक भालकर, कार्यकारी उपअभियंता श्री. मनोज सेठिया, शिर्के कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. केशव लावंड, प्रोजेक्ट मॅनेजर श्री. टी.के चव्हाण, स्थापत्य विभागाचे शाखा अभियंता श्री नरेश जाधव आदी उपस्थित होते.