पिंपरी :- मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून पुरुषांच्या वतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्यानंतर संस्थेच्या वतीने पिंगळे गूरव, नवी सांगवी, जुनी सांगवी परीसरातील महीलां वटवृक्षाला सूत बांधतात, आंबेचा नैवेद्य, फुले,जांभूळ, पान सुपारी, हळकुंड, गहू वाहतात. पावसाळी दिवस आसल्याने तेथे दूर्गथी पसरते, आणि सूतामध्ये माती जाऊन बसते त्यामुळे झाडांना किड ही लागते व परीसरात रोगराई पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नागरिक आजारी पडतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन. महीलांनी झाडांना बांधलेले सूत एक टेम्पो भरुन कापुन काढले व तीन पोते निर्माल्य काढले त्याचे योग्य त्या ठिकाणी विर्सजन केले. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सुत काढण्याचे काम करत असल्याचे शहाराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी सांगितले. व यापुढेही करणार आहोत .
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. त्यामुळे नंम्र पणे आव्हान करतो कि, जास्तीतजास्त नागरिकांनी पर्यावरण दिनीच वृक्षलागवड न करता वर्षभर आपापल्या वेळेप्रमाणे वृक्षाची लागवड करून कुटुंबाप्रमाणे संगोपन करावे आजचे वृक्षरोपन म्हणजे पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन सोय असे जोगदड म्हणाले.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड मूळशी विभाग प्रमुख करंजवणे, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्याक्षा संगिता जोगदंड सहसचिव गजानन धाराशिवकर, हनुमंत पंडीत, सदाशिव जाधव,निलेश हंचाटे, वसंतराव चकटे,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.