सातारा : शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपकजी राजेशिर्के साहेब यांच्या आदेशानुसार आज खटाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सातारा जिल्हा अध्यक्ष मा. निखिल तानाजी निंबाळकर, सातारा जिल्हा सचिव मा. दत्तात्रय भोसले (सर), श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक शाखा वडूज मॅनेजर श्री. हिरामण आढाव साहेब , फलटण तालुका अध्यक्ष शुभम माने , फलटण तालुका उपाध्यक्ष रोहन सावंत, सचिव निलेश जेधे, युवा समाजसेवक ऋषीकेश काशिद यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
कार्यकारणी मध्ये खटाव तालुका अध्यक्ष पदी गणेशवाडी (औंध) चे अतुल बबन घार्गे, खटाव तालुका उपाध्यक्ष पदी खरशिंग येथील रोहन घार्गे , तालुका उपाध्यक्ष पदी पाचवड चे बापूराव घाडगे , सचिव पदी शुभम कदम औंध, सहसचिव विशाल जाधव नांदोशी, सरचिटणीस हर्षल पवार अंबवडे, तालुका संपर्क प्रमुख विक्रम कदम पुसेसावळी, संघटक संग्राम माने पुसेगाव, प्रसिद्धी प्रमुख यश फडतरे गोसाव्यांची वाडी आदींची निवड करण्यात आली. निवडीबद्दल, सातारा जिल्हा व प्रदेश कार्यकारणी ने अभिनंदन केले असून भावी शंभुकार्यास शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.