सातारा (प्रतिनिधि) : सातारा जिल्हा, पाटण तालुक्यात शंभुसेना प्रमुख व सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. दिपक राजे शिर्के साहेब यांच्या आदेशानुसार व शंभुसेना सातारा जिल्हा अध्यक्ष मा. निखिल तानाजी निंबाळकर व जिल्हा सचिव मा. दत्तात्रय भोसले सर यांनी दिलेल्या नियुक्ति पत्रानुसार शंभुसेना पाटण तालुका अध्यक्ष पदी गणेश तानाजी मोरे व तालुका उपाध्यक्ष पदी सत्यम रविंद्र लाड यांची निवड करण्यात आली आहे.
निवडी याप्रसंगी श्रीमंत मलोजीराजे सहकारी बँकेचे वडुज शाखा प्रमुख हिरामण आढाव, शंभुसेना फलटण तालुका उपाध्यक्ष रोहन सावंत, फलटण तालुका सचिव निलेश जेधे, शंभुसेना खटाव तालुका अध्यक्ष अतुल घार्गे, रविंद्र माने, मिलिंद मोहिते, सचिन सावंत, आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते…
निवडीबद्दल शंभुसेना प्रमुख दिपकजी राजेशिर्के साहेब, शंभुसेना मार्गदर्शक व सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार ब्रिगेडियर सुधीरजी सावंत साहेब , शंभुसेना नेते व सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, शंभुसेना प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव यांच्यासह शंभुसेना व सैनिक फेडरेशनचे प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, गाव, शाखा स्तरावरील पदाधिकारी यांनी अभिनदंन करत शुभेच्छा दिल्या आहेत…