पिंपरी :- पिंपरी गाव, वैभव नगर मिलिंद नगर जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप व आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता ही रॅली विविध मार्गांवरून काढण्यात येणार असून, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार उषाताई वाघेरे, मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे, नरेश पंजाबी यांच्या प्रचारार्थ ही भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
या बाईक रॅलीची सुरुवात शगुन चौक येथून होणार असून साई चौक, साई स्टील, अशोक टॉकीज, महाराष्ट्र विद्यालय, गंगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी काळेवाडी पूल, जमतानी चौक, मिलिंद नगर या मार्गांवरून मार्गक्रमण करत समारोप सभा व सभास्थळी रॅलीची सांगता होणार आहे.
या रॅलीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करण्यात येणार असून, सर्व कार्यकर्ते, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाईक रॅली शक्तीप्रदर्शन ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
