राजकारणात मी नवी असले तरी मला कौटुंबिक राजकीय वारसा – प्रियंका कुदळे यांचे प्रतिपादन..
पिंपरी दि. 10 ( प्रतिनिधी) राजकारणात मी नवीन असले तरी मला कौटुंबिक राजकीय वारसा आहे. माझे आजोबा चंद्रकांत टिळेकर देहूचे सरपंच होते. तर सासरे रंगनाथशेठ कुदळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक होते. मला संधी मिळाल्यास मी प्रभागाच्या विकासासाठी संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, निकिता कदम यांच्यासोबतच माझे योगदान देईन. असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका कुदळे यांनी केले.
पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांनी प्रचार फेरी वैयक्तिक भेटीगाठी, घरोघरी संपर्क याद्वारे अवघा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पिंपरी गाव व पिंपरी कॅम्प परिसरात सर्व स्तरातील मतदारांचा पॅनलला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मारवाडी व मुस्लिम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचा निर्धार पॅनेलच्या प्रचारादरम्यान व्यक्त केला. प्रचार रॅली व घरोघरी संपर्काच्या वेळी पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे,हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे,कल्पना घाडगे,ज्योती साठे,अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .
यावेळी संदीप वाघेरे म्हणाले की, महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विकास कामे केली. त्यामुळे सर्व समाजाने प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन त्यांनी केले. प्रभागात नगरसेवक या नात्याने केलेल्या विविध विकास कामांचा आढावा त्यांनी मतदारांसमोर सादर केला.
