– अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग!
– प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराने प्रतिस्पर्ध्यांची धावपळ
– घराघरांत राष्ट्रवादीचा संदेश, जनतेचा कौल स्पष्ट! ;प्रभाग ९ मध्ये डॉ. वैशाली घोडेकर–लोंढे यांचा प्रचार आघाडीवर
पिंपरी, चिंचवड :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉ. वैशाली घोडेकर–लोंढे यांच्या पॅनलने अक्षरशः झंझावात निर्माण केला आहे. घरोघरी, गल्लोगल्ली सुरू असलेल्या प्रचारातून राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर(लोंढे), सारिका मासुळकर आणि सिद्धार्थ बनसोडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
डॉ. वैशाली घोडेकर–लोंढे यांनी प्रचारादरम्यान थेट मतदारांच्या गाठीभेटी घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सविस्तर संवाद साधला. “नुसती आश्वासनं नव्हे तर ठोस काम करून दाखवणं हाच आमचा अजेंडा आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या विकासकामांचा दाखला देत, हाच विकासाचा वेग प्रभाग ९ मध्ये आणण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शहरात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेली भरीव कामगिरी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे.

प्रचार फेरीदरम्यान महिला, युवक, व्यापारी वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. “डॉ. वैशाली घोडेकर–लोंढे या केवळ उमेदवार नसून त्या सेवाभावी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत,” अशा प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होत आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या पॅनलमधील उमेदवार राहुल भोसले, सारिका मासुळकर, सिद्धार्थ बनसोडे हे चारही उमेदवार एकसंघपणे काम करत असल्याने प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, प्रभागातील दुर्लक्षित भाग, झोपडपट्टी परिसर आणि मध्यमवर्गीय वसाहतींमध्येही राष्ट्रवादीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. “विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार,” हा संदेश प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात प्रचार यंत्रणा यशस्वी ठरत आहे.
एकूणच, प्रभाग क्र. ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. वैशाली घोडेकर–लोंढे यांच्या पॅनलच्या प्रचाराची आघाडी स्पष्टपणे दिसत असून, चारही उमेदवारांना मिळणारा वाढता जनाधार आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार.
