इंद्रायणीनगर ते आरटीओ चौक गजबजला; सरिता कुर्हाडे-गोरडे यांच्या प्रचार रॅलीत विक्रमी सहभाग…
इंद्रायणीनगर । प्रतिनिधी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत विजयाची नांदी दिली. पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुर्हाडे-गोरडे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. इंद्रायणीनगर, गवळीमाथा, बालाजीनगर, संतनगर ते आरटीओ चौक या संपूर्ण परिसरात रॅलीत मशाल पेटली.
नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीला साथ दिली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि उमेदवारावर झालेला फुलांचा वर्षाव यामुळे रॅलीला उत्सवाचे स्वरूप आले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत करण्यात आले. शिवसेना झिंदाबाद, पुन्हा पेटली मशाल या घोषणाने परिसर दणाणून सोडला होता.

सरिता कुर्हाडे-गोरडे या स्थानिक नागरिकांमध्ये सतत संपर्कात असलेल्या, अभ्यासू आणि कामाचा ठसा उमटवणार्या उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. रॅलीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, तसेच तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इंद्रायणीनगर, गवळीमाथा व बालाजीनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आमचा विश्वास सरिता ताई यांच्यावर आहे, अशी भावना व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आता सक्षम, निर्भय आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारी उमेदवार आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत यावेळी प्रकर्षाने दिसून आले.
रॅलीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांनीही उपस्थितांना संबोधित करत प्रभाग 8 मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मशाल चिन्हाला विजयी करण्याचे आवाहन केले. ही निवडणूक केवळ उमेदवाराची नसून प्रभागाच्या सन्मानाची आणि विकासाची आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले.
या रेकॉर्ड ब्रेक रॅलीने प्रभाग क्रमांक 8 मधील राजकीय चित्र स्पष्ट केले असून, सरिता कुर्हाडे-गोरडे यांच्या विजयाची मशाल आता जोरात पेटली असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांचा वाढता विश्वास, उत्स्फूर्त सहभाग आणि आक्रमक प्रचारामुळे येत्या निवडणुकीत प्रभाग 8 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत.
……………………..
प्रतिक्रिया
नागरिकांनी रॅलीदरम्यान दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवतो. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता या मूलभूत मुद्द्यांवर ठोस काम केले जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार घडवून आणण्यासाठी मी सतत नागरिकांच्या संपर्कात राहीन.
सरिता कुर्हाडे-गोरडे
उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, प्रभाग क्रमांक 8.
