पिंपरी (प्रतिनिधी) :- डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये लंडन ब्रिज, युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी. जे. अम्युझमेंटने यावर्षी पिंपरीकरांसाठी आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत. ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. आणि लंडन ब्रीज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील एचए- मैदान, नेहरू नगर, पिंपरी ४११०१८ याठिकाणी शुक्रवार दि.२६/१२/२०२५ पासून दररोज सायं ५ वाजलेपासून रात्री १० वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे, ही पर्वणी पिंपरी-चिंचवडकरांसाठी आहे. डीजे म्युझमेंटचे जयप्रकाश यांच्या आयोजनातून साकारलेले आहे अशी माहिती सुदेश कुमार (मॅनेजर), जयराज, रवी नायर, संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. याठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रीज हा १८० फुटाचा आहे. याची उंची ४५ फूट आहे तर रुंदी १५ फूट आहे. याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत. जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स, मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत. तर मुलांसाठी पेडलबोट, जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा
उपकरणे, कूलिंग भांडी, मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे. शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे. ज्याठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तके खरेदीकरता येणार आहेत. याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी,
सोलापुरी, पाणीपुरी, चाट, उटीचिल्ली भज्जी, कोलड्रिंक्स, आईस्क्रीम, चिल्ली गोबि मिरची भजी खाण्यास मिळणार आहेत. शिवाय सेल्फीही काढता येणार आहे. तरी पिंपरीमध्ये प्रथमच
आलेल्या या नगरीस पिंपरीकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच डि. जे. अम्युजमेंट प्रस्तुत लंडनब्रिज प्रदर्शन उद्घाटन शुभारंभ शुक्रवार दिनांक २६/१२/२०२५ रोजी सायं ६:३० वा. स्थळ- एच. ए. मैदान, नेहरूनगर, पिंपरी, ४११०१८. याठिकाणी करण्याचे योजिले आहे. तर प्रमुख पाहुणे श्री. राहूल (दादा) भोसले (मा. नगरसेवक पिं.चिं. मनपा), श्री. समीर
(दादा) मासुळकर (मा. नगरसेवक पिं.चिं. मनपा) इतर मान्यवर उपस्थित असणार असल्याचे श्री. सुदेश कुमार (मॅनेजर) डि. जे. अम्युजमेंट प्रस्तुत यांनी सांगितले.
