पिंपरी :- पिंपरी प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचाराची सुरूवात केली. माजी नगरसेवक संदीप वाघेरे, हिरानंद उर्फ डब्बू आसवानी,निकिता कदम, मीनाताई नाणेकर, दीपिका कापसे यांच्याबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून या प्रचाराला बळ दिलं.

प्रचाराचा शुभारंभ श्री काळभैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर, पिंपरी गावठान, वैभवनगर, मिलिंद नगर, शास्त्री नगर, साईं चौक, अशोक थिएटर यासारख्या प्रमुख ठिकाणी शानदार शक्ति प्रदर्शन करण्यात आले.प्रचार दौऱ्यात अनेक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना, “राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय नक्कीच ठरलेला आहे! संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोधकांच्या हुकुमशाहीला सडेतोड उत्तर देऊ!” असं सांगितलं. नागरिकांचे उत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्ये दुणवणारी ऊर्जा अजूनच वाढली.

महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून माजी नगरसेवक संदीप वाघेरे, हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, निकिता कदम, मीनाताई नानेकर आणि दीपिका कापसे यांचा भव्य व जल्लोषात स्वागत केला. “महिला सक्षमीकरणासाठी आणि समृद्ध पिढीसाठी हे उमेदवार लढत आहेत. आम्ही त्यांना संपूर्णपणे पाठिंबा देतो!” असे महिलांनी ठणकावून सांगितले तसेच प्रचाराच्या दरम्यान उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत, नागरिकांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांनी प्रचाराला जणू एक नवा ऊर्जा मिळाल्याचं दिसून आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *