पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथून माजी नगरसेवक कैलास थोपटे आणि नवा चेहरा सागर कोकणे हे इच्छुक आहेत, त्यामुळे या दोघां पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कोणाला संधी देणार.
रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मध्ये सर्व साधारण गटातून पुरुष उमेदवाराला एकमेव संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक कैलास थोपटे हे पुन्हा इच्छुक आहेत. ते रहाटणी भागातून 2007 व 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घडाळ चिन्हांवर प्रचंड मताने निवडून आले होते.ते शांत,संयमी म्हणून शहरात ओळखले जातात.त्यांनी 10 वर्षे त्या प्रभागातून नगरसेवक म्हणून नेतृत्व केले आहे.तर सागर कोकणे हे नवीन चेहरा आहेत, त्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून काम केले आहे. माजी नगरसेवक खंडुशेठ कोकणे यांचे ते चिरंजीव आहेत.
माजी नगरसेवक कैलास थोपटे यांचे या प्रभागात चांगले वर्चस्व आहे. त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपची प्रचंड लाट होती.त्या लाटेत अनेक चांगल्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यांचा ही त्यावेळी पराभव झाला. सध्या त्या प्रभागात सागर कोकणे ही चांगले काम करत आहेत. त्यांनी गेल्या 4 – 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रहाटणीत जिवंत ठेवला आहे. त्यामुळे सागर कोकणे या प्रभागातून इच्छुक आहेत. माजी नगरसेवक कैलास थोपटे यांना काही स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध आहे. मात्र पॅनेलमध्ये ज्येष्ठ, अनुभवी माजी नगरसेवक कैलास थोपटे असावेत असे काहींचे मत आहे. त्यामुळे अजित दादा हे आपल्यालाच तिकीट देतील अशी माजी नगरसेवक कैलास थोपटे यांना आशा आहे.त्यांनी पुण्यात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी मुलाखत दिली आहे.
रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मधून माजी नगरसेवक कैलास थोपटे आणि सागर कोकणे यांच्या सध्या उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे आणि पक्षालाही कैलास थोपटे आणि सागर कोकणे या दोघांची गरज आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातून अर्थात खुल्या वर्गातून कोणाला अजित दादा तिकीट देतात हे बघावे लागेल. मात्र दोन वेळा नगरसेवक असल्याने कैलास थोपटे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. आता हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाला उमेदवारी मिळते.
