पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात दहशत गुंडगिरी दादागिरी दडपशाही भ्रष्टाचार यांचे रान बोकाळले आहे. या दहशतीला तसेच दहशत पसरविणाऱ्यांना मुठमाती देण्यासाठी पुन्हा एकदा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या क्रांतीची वेळ येऊन ठेपली आहे. येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मी उभी असून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला निवडून देऊन ही दादागिरी दहशत संपविण्यासाठी मी उचललेल्या पावलाला बळकटी देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी केले.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी चिंचवड येथील क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी पिंपरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व शिवसेनेचे संपर्कप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार हेही उपस्थित होते.
डॉ. सुलक्षणा शिलवंत या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यासाठी आले असताना तेथे उपस्थित असलेले संजय धुतडमल, नितीन घोलप, युवराज दाखले, गणेश लोंढे, सचिन पारवे, मंगेश डाखोरे, सुनील खुडे, शिवाजी खडसे, अनिल तांबे आदींनी त्यांचे स्वागत केले.