पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पिंपळे निलख – विशालनगर परिसरातून 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल दादा कलाटे यांची पदयात्रा पार पडली पिंपळे निलख – विशालनगर येथिल नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले व पदयात्रेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी पिंपळे निलख येथिल पक्षाच्या कार्यालयासमोर मोठ्या स्वागत केले .विजयी मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास दिला .यावेळी चिंचवड विधानसभेत परिवर्तन घडवून आणू असे रविराज काळे यांनी सांगितले. यावेळी पदयात्रेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव पृथ्वीराज साठे, शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि पिंपळे निलख येथिल ग्रामस्थ,युवा तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.