शंकरभाऊंच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार
भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या मेळाव्यात युवकांची वज्रमुठ
मेळाव्यात हजारो तरुण सभासदांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
चिंचवड : प्रतिनिधी, २४ ऑक्टोबर २०२४ – चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे. शंकरभाऊंना मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मताधिक्याने आमदार पदी निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल असा संकल्प, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या हजारो सभासदांनी केला.
वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक कामगार युनियन महासंघाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला शहरातील जवळपास १३०० हुन अधिक सभासद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
“सध्या समाजातील तरुणांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे आणि वाममार्गाला लावण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र शंकरभाऊ आणि अनुप मोरे यांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत हजारो युवकांचे कुटुंब सावरण्याचे आणि आमची आर्थिक उन्नती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही कायम शंकरभाऊसोबत आहोत. व या निवडणुकीत एकजुटीने त्यांनाच आमदार करण्यासाठी काम करणार”, अशी भावना युनियनच्या पदाधिकारी व सभासदांनी व्यक्त केली.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शेखर चिंचवडे, युवा मोर्चाच्या सचिव तेजस्विनी कदम, माथाडी युनियनचे बाबू भोंडवे, प्रवीण यादव, इम्रान पानसरे, ऋत्विक कुटे, अजय थोरात, रोहन पवार, महेश पवार, सागर वाघमोडे, बबलू जोगदंड, विकी भिसे, गोट्या शर्मा, अमर गावडे, आकाश रणदिवे यांच्यासह भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
——————————
एक लाख मताधिक्याचा टप्पा ओलांडण्यासाठी आम्ही सज्ज – अनुप मोरे
पिंपरी चिंचवड शहरातील युवकांच्या रोजगारासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. भारतीय जनता युवा मोर्चा असो की माथाडी व सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन असो शंकरभाऊ नेहमी आमच्या सहकार्यासाठी तत्पर असतात. हीच तत्परता आता आम्ही व आमचे हजारो सदस्य या चिंचवड विधानसभा निवडणुकीत दाखविणार असून यावेळी किमान एक लाख मताधिक्याचा टप्पा ओलांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शंकरभाऊंना आमदार करण्याचे आमचे स्वप्न असून ते स्वप्न २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
——————————
शहरातील तीनही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी तुमची – शंकर जगताप
देशातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सर्वसामान्य जनता सुखात व आनंदात राहील हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो. त्यामुळे आपल्याला राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची असून जास्तीत जास्त संख्येने सर्वसामान्य जनता मतदानासाठी बाहेर पडेल आणि आपल्या महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करेल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत.