पुणे – सोलापुर रोड, चौफुला, ता.दौंड, जि. पुणे येथे संघर्षयोद्धा मा.श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन ऐतिहासिक राजघराणे व सरदार घराण्यातील वंशज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घघाटन प्रसंगी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, माजी सेलचे राज्यप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे कार्याध्यक्ष व ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे (महाराणी येसुबाई साहेब) वंशज मा. श्रीमंत दिपकराजे शिर्के, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज मा. कुणालजी मालुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याचे वंशज मा.राजेंद्रजी मोहिते पाटिल, वीर बाजी पासलकर यांचे वंशज मा. राजाभाऊ पासलकर, मा. गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे विश्वस्त मा.सचिनजी भोसले, अनिकेतजी शिंदे सरकार, मराठा समाजसेवक मा. राजाभाऊ तांबे शंभुराजे वाघोले पाटील, निहालसिंह मोहिते, आदींसह असंख्य मराठा सैनिक उपस्थित होते.
यावेळी आयोजक मराठा सेवकांच्या वतीने मा.श्रीमंत दिपकराजे शिर्के यांच्यासह सर्व वंशज मान्यवरांचे स्वागत करत पुष्पगुच्छ, मानाची पगडी व गौरवचिन्ह देऊन सन्मानीत केले. कार्यक्रमासाठी अनेक मराठा बांधवांचे परिश्रम लाभले.
जय शिवराय, जय शंभुराजे, जय येसुबाई..!
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा..!