संजोग वाघरे पाटलांच्या सोबत तरुणाई एकवटली…

खोपोली, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा मतदारसंघात बोलबाला असून त्यांच्यासाठी प्रचारात तरुणाई गावा गावात एकवटत आहे. खोपोली परिसरात प्रचार दौ-यात “संजोग वाघेरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गाव गावात फटाके फोडून त्यांचे स्वागत केले जात होते. महिला त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, महेश पाटील, निखिल पाटील, सुरेश कडव, चिंतामण चव्हाण, मंगेश पाटील, मनोज पाटील, प्रशांत साळुंखे, संतोष पाटील, विलास चालके, उत्तम भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे संतोष जंगम, किशोर पाटील, अविनाश नावडे, संतोष पाटील, शांताराम पाटील, भाई पाटील, यांच्यासह अजी माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते युवावर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मावळ लोकसभेच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराला तरुण कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. वाघेरे पाटील यांना प्रचार दौऱ्यातही प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. संजोग वाघेरे यांनीच मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार, हे निश्चित झाले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तरुण प्रचारात जोमाने कामाला लागले आहेत. तो महाविकास आघाडी सोबत आहे. आजच्या तरुणांचे भविष्य अंधारात आहे. तरी ही लक्ष देवून आहेत. आपल्याला भविष्यात अंधार दूर करून उजेड कोण दाखवेल आणि कोण दिशा देईल. यासाठी तरुणाई महाविकास आघाडीच्या पाठशी असून ह्या तरुणांचा मला भरघोस पाठिंबा आहे, उमेदवार संजय वाघेरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खोपोली परिसरातील साजगाव, होणाड, आत्करगाव, ठाणेन्हावे, देवन्हावे, उंबरे, चावणी, शेमडी, दूरशेत, खाणाव, चिलठण, खरीवली, नारंगी, आपटी, नंदनपाडा, होराळे जांभीवली, गोरठण, वावोशी, शिरवली या सर्व गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला साथ देण्यासाठी मशाल चिन्ह निवडा, असे आवाहन उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी या वेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *