पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी येथील पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचे काम स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत व्ही.एम.मातेरे या संस्थेला देण्यात आले होते सदर पुलाचे काम पूर्ण होऊन आज महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सकाळी ९ वाजता करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,महापालिका आयुक्त शेखर सिंह.अति.आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,नगरसेवक संदीप वाघेरे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे,निकिता कदम,डब्बू आसवानी, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे,कार्यकारी अभियंता बापू गायकवाड,उपअभियंता अभिमान भोसले,कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे,प्रणिता पिंजण सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघेरे,अनिल रसाळ,बाबा मोरे,हनुमंत वाघेरे,सचिन गव्हाणे, कमलेश वाघेरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर पुलाचे लोकार्पण झाल्याने वाहतूक सुरु होऊन पिंपरी गाव, पिंपळे सौदागर,रहाटणी,काळेवाडी परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याने नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त होत असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *