कामगार पुरुष भजन स्पर्धेत टाटा मोर्टरस कंपनी लि. पिंपरी. श्री.गुरुदत्त सेवा भजनी मंडळ तर महिला विभागामधे कामगार कल्याण केंद्र,भोर,पुणे.सुमंगल भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला…

पिंपरी – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे गटाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय सप्ताह निमित्त गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धा व महिला भजन स्पर्धा दिनांक ७ व ८ ऑक्टोबर२०२४ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर एच. ए.कॉलनी पिंपरी पुणे १८.येथे संपन्न झाल्या सदर स्पर्धेत महिला भजन स्पर्धेत एकुण ११ संघाने व कामगार पुरुष भजन स्पर्धेत एकूण ८ संघाने सहभाग घेतला. कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.सतिश मोटे सिनिअर मॅनेजर एच. आर टाटा मोर्टरस, पिंपरी.तसेच विशेष उपस्थिती मा.सौ.सुनिता शिवतारे सहाय्यक प्रबंधक,मानव संसाधन हिंदुस्थान एंटींबायोटिकस लि. पिंपरी., मा. ह. भ. प. विजय महराज बोत्रे संत साहित्याचे अभ्यासक,मा.विजय चौधरी उद्योजक स्वराज ग्रुप कंपनी. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प प्रशांत महाराज मोरे संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज अध्यक्ष,संत विचार महा परिषद महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. स्पर्धेचे परिक्षण ह.भ.प मधुकर मोरे,ह.भ.प नेहा कुलकर्णी ,ह.भ.प शिवनारायण काशीद यांनी केले.या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर पुजापाठ समितीचे दिलीप कोंडे,विजय जगताप,रवी चव्हाण,दिपक भुजबळ, एच.ए.एम.एस युनियन पदाधिकारी,गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के ,अण्णा जोगदंड, प्रकाश घोरपडे , शामराव गायकवाड, यादव तळोले,प्रवीण वाघमारे, राजेश हजारे,विकास कोरे, शंकर नानेकर इ.मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता मा.मनोज पाटील सहा. कल्याण आयुक्त पुणे.यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत यांनी केले सुत्रसंचालन सुनील बोरावडे केंद्र संचालक यांनी केले तर आभार प्रदिप बोरसे केंद्र संचालक ,यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन अनिल कारळे, संदिप गावडे,अविनाश राऊत, अरुण वाडकर, रुपाली मुळीक,शोभा पांगारे,शुभांगी नावडिकर,सुचिता वाशिकर ,प्रतिभा येरम,सुरेखा मोरे,संगिता क्षिरसागर,माया कदम, भारत शहापूरकर, लक्ष्मीकांत पारसकर,प्रविण श्रीवास,दत्ता आढारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *