पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील आद्य पत्रकार कै.भा.वी.कांबळे यांची 86 वी जयंती पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या वतीने एकत्रितपणाने महानगरपालिका भा.वी.कांबळे पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली. यावेळी अति.आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारीता जागृत व निर्भिड आहे. मी महाराष्ट्र राज्यात अनेक भागात फिरलो तेथील पत्रकारीता आणि येथील पत्रकारीतेत फरक आहे. येथील पत्रकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
यावेळी महापालिका उप आयुक्त आण्णा बोदडे, यशवंत भोसले, प्रतापराव गुरव, देवेंद्र तायडे, राजन वडके, विवेक इनामदार, गोविंद देशपांडे, दादा आढाव, संतलाल यादव, अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब ढसाळ म्हणाले, पत्रकारीता टोचणारी असावी भोकसणारी नसावी. सध्याच्या नवीन पत्रकारांना शिकण्यासारखे भरपूर आहे.
यावेळी बापूसाहेब गोरे म्हणाले, मी भाग्यवान आहे मला त्यांच्या हाताखाली सहा महिने काम करायला संधी मिळाली. ते खरोखरच सर्व गुण संपन्न आहेत. काकानी पत्रकारांची एक आदर्श पिढी घडवली. या शहरातील राजकारणी, सामाजिक कार्यकर्त हे मार्गदर्शन घेण्यासाठी त्याच्यांकडे येत असत.
यशवंत भोसले म्हणाले, भा.वी.कांबळे हे आमचे मार्गदर्शक असून पिंपरी येथे छोटेखानी वर्तमानपत्र चालू केले. त्याचा वारसा नाना कांबळे यांनी पुढे चालू ठेवला आहे.
यावेळी विलास जगताप, राजू गवते, विजय सोनावले यांनी भा.वी. कांबळे यांच्या बद्दल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास अमोल काकडे, विकास शिंदे, बाबू कांबळे, अनिल भालेराव, राम बनसोडे, देवा भालके, दिलीप देहाडे, राजश्री पवार, भाऊसाहेब आढागळे, मुजफ्फर इनामदार, विनय लोंढे, अशोक कोकणे, प्रितम शहा, राजू वारभूवन, सीता जगताप, अशोक पारखे, बाबू (प्रविण) कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाना कांबळे यांनी केले. तर आभार प्रविण शिर्के यांनी मानले.