पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने १२ हजार गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, यापैकी गुरुवारी पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील २ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
माळीन, फुलवाडे व बोरघर (ता. आंबेगाव) येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या २ हजार विद्यार्थ्याना वह्या, पेन, पेन्सिल, कापडी पिशवी, कॅलेंडर, परीक्षा पॅड, भारताचे संविधान, तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित संच आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात
यावेळी बोलताना वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, की देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून शरद पवारांनी आपले वेगळेपण जपले आहे. गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी अनेक मंत्रि‍पदावरही काम केले आहे. आज राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी शरद पवार यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळेल.

माळीन (ता. आंबेगाव) येथील दुर्घटनेच्या दु:खातून अजूनही येथील नागरिकांना विसर पडलेला नाही. या लोकांचा फक्त शेतीवर उदरनिर्वाह आहे. काहीजण हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणात मदत व्हावी, या उद्देशाने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी औदुंबरे शिक्षण संस्थेचे श्रीरंग गभाले हायस्कूल (फुलवडे ता. आंबेगाव) चे मुख्याध्यापक, भवारी सर, आनंद सर, फुलवडे गावचे सरपंच बबन मोहरे, जनता शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बोरघर (ता. आंबेगाव) चे मुख्याध्यापक भालेराव सर, बोरघर गावचे सरपंच विजय जंगले, रयत शिक्षण संस्थेचे कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय माळिण (ता.आंबेगाव) चे मुख्याध्यापक लोखंडे सर, देठे सर, माळिण गावचे सरपंच रघुनाथ झांजरे, उपसरपंच हेमंत भालचिम, स्कूल कमिटी सदस्य रोहिदास लेंभे, विजय लेंभे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी डी. बी. घोडे (निवृत्त विक्रीकर उपआयुक्त), मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार, कृष्णा भालचिम, शंकर तांबे, रोहित जाधव, बाळासाहेब साळुंखे, सखाराम वालकोळी, सौरभ शिंदे, कॅप्टन बालाजी पांचाळ, महेश दरेकर, शिवाजी सुतार, अयान अंसारी, सोमेश्वर झुमके, ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *