पिंपरी :- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बहुजन विकास आघाडी या सामाजिक संघटनेच्या आनंदनगर, चिंचवड येथील नामफलकाचे भव्य आणि उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे व शितल शिंदे हे उपस्थित होते. तसेच बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आघाडीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते नाना कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर संघटनेच्या शाखेचा नामफलक उभारण्यात आल्याने सामाजिक समतेचा, लोकशाही मूल्यांचा आणि संविधानिक हक्कांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय व जनहिताच्या प्रश्नांवर बहुजन विकास आघाडी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष दशरथ कांबळे, दिलीप भाऊ खिलारे, मल्हारी कांबळे, अक्षय म्हात्रे, मनोज क्षीरसागर, कमलाकर गायकवाड, मिलिंद सोनवणे, प्रवीण निशिगंध, ज्योतीताई शिंदे, सविताताई आवळे, इंदुबाई कांबळे, वैशाली कांबळे, गौरव कांबळे, कैलास भाऊ कसबे, बबली ताई, तानाजी कांबळे, सुनील कांबळे, मल्हार साठे, चेतन वाघमारे, पप्पू मस्के, इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजहितासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *