पिंपरी : मी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी शरद पवार गटाचा पिंपरी चिंचवड शहराचा सरचिटणीस म्हणून काम करत आहे. मी विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रियाशील कार्यकर्ता आहे. अनेक आंदोलने, ठिय्या आंदोलन केली आहेत. विद्यार्थी दशेत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सक्रीय कामे करीत आलेलो आहे. तसेच अनेक सामाजिक संघटनेत हिरिरीने सहभाग घेतला आहे. पक्षातर्फे काढलेल्या अनेक मोर्चाला सहभाग घेतलेला आहे.

पिंपरी विधानसभेतील युवकांना रोजगार मिळावा यासाठी
प्रयत्न करणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कारण देशात बेरोजगारिचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी मला आमदार व्हायचे आहे.

पिंपरी विधानसभेमध्ये विविध कामे रखडलेले रस्त्याचे काम असेल पाणीपुरवठ्याचा नियोजन, झोपडपट्टी झोपडपट्टी पुनर्वसन बरोबर युवकांच्या रोजगाराचासंदर्भात विविध प्रश्नावरती काम करण्यासाठी मला पिंपरी विधानसभेतील संधी मिळावी याकरिता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आमच्याकडे उमेदवारी संदर्भात मागणी देखील केलेली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष प्रशांत कापसे, पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कस्पटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *