वडाची झाडे मोकळी केली मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी…

पिंपरी :- वटपौर्णिमेनिमित्त सात जन्म हाच पति मिळावा म्हणून ज्या सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाला भावपूर्ण फेऱ्या मारल्या त्या वडाच्या झाडांना पर्यावरण संवर्धन म्हणून दोरे, कापूस,पणत्या, नैवद्य फुले, हार यांनी वेढलेली वडाची झाडे मुक्त केली याचा मला विशेष आनंद वाटतो असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार सूर्यकांत भोसले यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले.. रूढी आणि परंपरा याचे जतन करणे आपल्या सर्वांचा संस्कार आहे पण वृक्षांचे संवर्धन करणे, झाडे निकोप ठेवणे,मोकळा श्वास जसा माणसाला आवश्यक आहे तसा झाडांना आवश्यक आहे याची जाणीव ठेवून मानवी हक्क संरक्षण जागृती आणि दिलासा संस्था यांनी सामाजिक प्रेरणेतून हे समाजोपयोगी काम केले आहे याचा एक साहित्यिक म्हणून आनंद वाटतो.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले.. “परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यानुसार आम्ही पुरुषांनी जर स्त्रियांबरोबर वडाच्या झाडाला दोरे बांधत मनोभावे प्रदक्षिणा घेतल्या असतील तर झाडांना मोकळे करणे हे आमचेच काम आहे म्हणून दिसायला छोटा असेल कदाचित असा हा उपक्रम आम्ही दोन्ही संस्थेच्या वतीने घेतला आहे. हे सर्व काम करताना आम्हाला असे आढळले की, वडाच्या झाडांना खूप खिळे ठोकले होते. असे काम शहरातील सुज्ञ नागरिकांनी यापुढे करू नये असे आवाहन जोगदंड यांनी केले.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले.. “दिलासा संस्था पर्यावरणासाठी सातत्यपूर्ण काम करत आहे. पवना नदी प्रदूषित होत आहे यासाठी लाक्षणिक उपोषणही केले आहे. नदी प्रदूषणाविषयी दोन्ही संस्थांनी जनजागृती केली आहे. हे सर्व काम फक्त याच संस्थांनी नव्हे तर शहरातील सर्व संस्थांनी मनःपूर्वक करावे यासाठी असे उपक्रम मानवी हक्क संरक्षण जागृती आणि दिलासा संस्था सातत्यपूर्ण करीत आहे.

याप्रसंगी  मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर,सचिव  मुरलीधर दळवी,सामाजिक कार्यकर्ते दिनकर क्षीरसागर,महिला अध्यक्षा मीना करंजावणे, सामाजिक कार्यकर्ते अमित निंबाळकर, सारंगी करंजावणे हे कार्यकर्ते हातात कात्री, कटर, हॅन्ड ग्लोज घालून पर्यावरण सेवेसाठी उपस्थित होते.
आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुरेख दिसावे असावे यासाठी मानवी हक्क संरक्षण जागृती आणि दिलासा संस्था कायम कटिबद्ध आहेत.” स्वच्छ भारत स्वच्छ भारत ..स्वच्छ भारत हो! हे गीत कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवर ऐकूनच ही प्रेरणा घेतली गेली आहे.
आपले शहर नेहमी स्वच्छ आणि सुंदर रहावे म्हणून हा प्रयत्नशील उपक्रम प्रतिवर्षी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ,दिलासा संस्था करीत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *