पिंपरी :- सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळा भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला.
रुपी सहकारी गृहरचना संस्था मर्या. रुपीनगर श्रीदत्त जयंती सोहळा – वर्षे 40, शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर ते 5 जाने. 2025 आयोजित श्री गुरुचरित्र पारायण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये अनेक भक्तांनी सहभाग घेतला.
श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त कलश पूजन अभिषेक, दत्तत्याग महायज्ञ, महिला मंडळाचे भजन, नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा, माता पिता वारकरी गुरुकुल विद्यार्थ्यांचा भारुडाचा कार्यक्रम, भव्य पालखी प्रदक्षिणा, पावली- खेळ, काल्याचे कीर्तन आणि शेवट महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, व्यक्तींनी हजेरी लावली. श्रीदत्त सेवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद यांच्या माध्यमातून सभामंडपाच्या पुढे शेड उभारण्यासाठी मदत झाली. तसेच सन्माननीय शांताराम बापू भालेकर, सा. कार्यकर्ते धनंजय भालेकर, श्री. संदीप जाधव, श्री. दादा सुखदेव नारळे, श्री. प्रवीणसेठ भालेकर, महिला सा. कार्य. संगीता ताई भालेकर, सुजाता मामी काटे, श्री. सुरेश कदम, श्री सर्जेराव कचरे,श्री. प्रवीणशेठ भालेकर श्री. सोमनाथ मंडलिक, पंकजशेठ भालेकर, रवींद्र सोनवणे कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विविध भागातून होऊन दत्तभक्त आले होते, रुपी हाऊसिंग सोसायटी मधील सर्व सभासद बंधू-भगिनी, शिवतेज मित्र मंडळ, शिवाई महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले.
श्री दत्त सेवा प्रतिष्ठानचे शिरीष (भाऊ) उत्तेकर,शामकांत (दादा) सातपुते, गजानन वाघमोडे, नितीन बिरादार, गणेश मगर, विशाल खानेकर, संदीप पवार, तुषार दुर्गे, महिला अध्यक्ष जयश्री (नाणी) हलगी, सचिव योगेश कारंडे, या सर्वांच्या वतीने दत्तमंदिर जर्णोद्धारासाठी ज्या नागरिकांनी देणगी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
