-पिंपरीत संजोग वाघेरे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

– 4 जूननंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नसतील

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रत्येक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. विशेषत: मावळ लोकसभा मतदारसंघात जिथे गद्दारी झाली. ही गद्दारी पूर्णपणे मातीत गाडावी लागणार आहे. त्यासाठी मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवायचं आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच, देशात परिवर्तन होणार असून येत्या 4 जूननंतर नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी येथील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी (दि.28 एप्रिल) बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर, मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील, शिवसेनेचे महारष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मावळ लोकसभेचे समन्वयक केसरीनाथ पाटील, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गट असंघटीत कामगार विभागाचे काशिनाथ नखाते, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षा मीना जावळे, समाजवादी पक्षाचे बि.डी. यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या पिंपरी चिंचवड महिला शहरअध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे, महिला उपजिल्हा प्रमुख वैशालीताई मराठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर, रामचंद्र माने, शिवसेना पिंपरी चिंचवड आणि मावळ सहसमन्वयक सुशीला पवार, संघटिका शैलाताई खंडागळे, युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार, छावा संघटनेचे धनाजी येळकर, शरद पवार गटाचे युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख, सागर तापकीर, यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, 2019 मावळ लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता. आता त्याच अजित पवारांना श्रीरंग बारणे यांचा प्रचार करावा लागत आहे.‌ हि किती मोठी खंत आहे. त्यामुळे हेच अजित पवार श्रीरंग बारणेंचा पराभव करतील. अजित पवारांना आता बारामतीत नवरा म्हणून निवडणुकीत उतरावं लागत आहे. तरीही मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव नक्कीच होणार असा ठाम विश्वास राऊत यांनी या वेळी व्यक्त केला.

उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे. हा स्वाभिमानी मतदार गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. आपण जे स्वप्न पाहत आहे ते निश्चिंतच मावळमधील मतदार राजाने तयार केले आहे. मावळ मधील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पक्षातील व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. आपली मावळची जागा “मशाल’ पेठवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही वाघेरे यांनी दिली.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे स्वागत केले. कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, छावा संघटनेचे धनाजी येळकर, माजी नगरसेवक रामचंद्र माने यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले. आभार युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *